GUPTA MECHANICAL

IN THIS WEBSITE I CAN TELL ALL ABOUT TECH. TIPS AND TRICKS APP REVIEWS AND UNBOXINGS ALSO TECH. NEWS .............

Friday 17 December 2021

 Maha Relief Fund - PM Fund


MAHA RELIEF FUND

➡️अधिदान व लेखाधिकारी , मुंबई यांना असे कळविण्याचे मला निदेश आहेत की , वर नमूद दिनांक २६.११.२०२१ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार ,  महामारी या आजारामुळे मृत पावलेल्याव्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास रू .५०,००० / इतके सानुग्रह सहाय्य प्रदान करणे या योजनेकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा कडून मंजूर करण्यात येणाऱ्या ५००० अर्जदारांना रु .५०,००० / - प्रत्येकी याप्रमाणे एकूण रु .२५,००,००,००० / - ( पंचवीस कोटी फक्त ) इतकी रक्कम मंजूर करण्यात आहे .

➡️वर नमूद शासन परिपत्रक दिनांक ०८.१२.२०२१ अन्वये विहित कार्यपध्दतीनुसार अधिदान व लेखाधिकारी कार्यालयास देयक सादर करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी . 

➡️देयक मंजूर झाल्यानंतर देयकाची रक्कम ईसीएसव्दारे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी उघडण्यात आलेल्या खालील तपशीलाच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी . ( वेतनेत्तर ) ( २२४५ ०१५५ ) या लेखाशीर्षाखाली पुर्नविनियोजनाव्दारे उपलब्ध होणाऱ्या निधीमधून भागविण्यातयावा . 

➡️याबाबतचे देयके अधिदान व लेखा कार्यालय , मुंबई यांना सादर करण्याकरिता , लेखाधिकारी , आपत्ती व्यवस्थापन प्रभाग , आहरण व संवितरण अधिकारी आणि वित्तीय सल्लागार व सह सचिव यांना नियंत्रक , अधिकारी , म्हणून घोषित करण्यात येत आहे . 

➡️या योजनेखालील लाभार्थ्यांची संख्या मोठया प्रमाणात असलयाने आणि संगणकीय प्रणालीव्दारे आधार संलग्नीत खात्यामध्ये रक्कम जमा होणार असल्याने देयकासोबत लाभार्थ्यांचा तपशील उपलब्ध करून दिला जाणार नाही . मात्र , प्रत्येक देयकाचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांना वर्षाच्या अखेरीस सादर करण्यात येईल .

2 REGISTRATION & INFORMATION
➡️मुंबई , दि . 8 : महामारी या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु .50,000 / - सानुग्रह सहाय्य देण्यातबाबत सर्वोच्च न्यायालयाने दि . 04 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार , महसूल व वन ( आप व्यवस्थापन , मदत व पुनर्वसन ) विभागाने शासन निर्णय 26 नोव्हेंबर रोजी निर्गमित केला आहे .

➡️या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने Online web portal विकसित केले असून , याद्वारे महामारी या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्राप्त करुन घेण्यासाठी कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल . यासाठी अर्जदाराने वेबसाइट यावर लॉगिन करणे आवश्यक राहील . तसेच यासाठी

➡️ यावर देखील लिंक देण्यात आली आहे . अर्जदारास , त्याचा आधार क्रमांक , मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील ( पर्यायी ) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत : चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल . केंद्र शासनाकडे ज्यांच्या महामारी मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल . इतर प्रकरणी , महामारी मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील . अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर महामारी मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठ्यर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील .

➡️जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावर अर्जदारास शासन निर्णय क्र . सार्वजनिक आरोग्य विभाग , न्यायिक -2021 / प्र.क्र .488 / आरोग्य -05 , दिनांक 13 ऑक्टोबर , 2021 अन्वये जिल्हास्तर / महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील . 

➡️अर्ज अंतिमत : मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील . 

➡️सानुग्रह सहाय्यासाठी मंजूर करण्यात येणारे सर्व अर्ज 7 दिवसांकरिता वेब पोर्टलवर सार्वजनिक करण्यात येतील , जेणेकरुन मृत व्यक्तीच्या योग्य वारसास सहाय्य मिळावे याकरिता त्याला अपिल करण्याची संधी मिळू शकेल . 

➡️जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अंतिमत : मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार , अर्जदाराच्या आधार संलग्निय बँक खात्यामध्ये सानुग्रह सहाय्याची रक्कम थेटरित्या जमा करण्यात येणार आहे . 

➡️सूचना - अर्जदारांनी केलेल्या अर्जाची छाननी करून अर्ज  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मंजूर करण्यात येईल . अर्ज दाखल केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत अर्जदाराच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यामध्ये र ५०,००० सानुग्रह सहायची रक्कम वितरित केली जाईल .

3 DONATE IN PMNRF
➡️Prime Minister's National Relief Fund, (PMNRF) accepts voluntary contributions from Individuals, Organizations, Trusts, Companies and Institutions etc. All contributions towards PMNRF are exempt from Income Tax under section 80(G). It is informed that Prime Minister's National Relief Fund (PMNRF) does not collect any money through SMS/Missed call services or through any such service provider. It is advised that any such Calls/ Messages should not be entertained.

No comments:

Post a Comment